अनिल.ना.दमाहे
भातपीक हे गोंदिया आणि भंडारा
जिल्ह्यात प्रामुख्याने पिकविले जाणारे अन्नपीक आहे. हे दोन्ही जिले विदर्भाच्या
पूर्वे दिशेला असून मुख्य दळणवळणाचे केन्द्र आहे. स्थानीक लोंकाचे शेती
प्रामुख्याने भातशेती किंवा धान उत्पादन इथे मुख्य व्यवसाय आहे. तांदळाचे भरघोस
उत्पादनामुळे गोंदिया हे 'Rice City' या
नावाने प्रसिद्ध झालेले आहे.
भातपीक (तांदुळ):-
भारतात तांदुळ किंवा भातपीक प्रमुख अन्नपीक म्हणून गणले
जाते. जगात अर्धी लोंकसंख्याचे भात हे प्रमुख आहार आहे (वने व पर्यावरण मंत्रालय,२०११). भातपीक असंख्य लोकांना
अन्नसुरक्षा प्रदान करते तसेच भातपीकाला आर्थिक आणि सांस्कृतिक मुल्य प्राप्त आहे.
भारतात लोंकाच्या जीवनशैलीत भातपीकाला विशिष्ट स्थान लाभलेले आहें आणि भातपीक हे
प्रत्येक जनमानसाशी एकरूप झालेले आहे. भाताचा अनेक प्रकारे उपयोग केला जातो उदा.
अर्भक पदार्थ, कडधान्य, बिअर आणि किण्वन (fermented) पदार्थ, फराळ पदार्थ ईत्यादी.
जगात
एकूण १४४ देशात भातपीकाचे उत्पादन केले जाते आणि हे उत्पादन क्षेत्र १५५ दशलक्ष हैक्टर एवढे आहे.
जगातील भाताच्या एकूण उत्पादनापैकी ९०% पेक्षा जास्त उत्पादन एकटया आशिया खंड़ात
होते. तर जगातील भाताच्या उत्पादनापैकी ७५% भात हे आशिया खंड़ातील लोक सेवन करतात.
भातापासून घेण्यात येणारी
कॅलरीज:-
दक्षिणपूर्व आशीयाई लोक:- एकूण कैलरीजच्या ६०% कॅलरीज.
पूर्व आशियाई व दक्षिण आशीयाई लोक:-एकूण कैलरीजच्या ३५%
कॅलरीज.
सर्वाधीक तादंळाचा खप (दरवर्षी १३० ते १८० किलो
प्रतिव्यक्ती) हा प्रामुख्याने आशिया खंडातील बांग्लादेश, कंबोडीया, लाओस, बर्मा, थायलंड, ईडोंनेशीया आणि विएतनाम इथे
दिसून येतो.
इतर अन्नपीकाच्या तुलनेत भाताची कॅलरी (प्रतियुनिट लागवड
क्षेत्र) जास्त असल्यामुळे भात जास्तीत जास्त लोंकाची पूर्ति किंवा गरज भागवू
शकतो. वाढिव लोकसंख्यामुळे भातपीकाची लागवड मोठया प्रमाणावर करण्यात येते.
अन्नसुरक्षेच्या दृष्टीने भात अतीमहत्वाचे पीक झालेले आहे.
भातशेती,गोंदिया
भातपीक- पाणथळ लागवड पद्धत
अवलंब करण्यात आलेला कालखंड व प्रदेश:
लोकाभिमुख झालेला भातपीक व त्याची लागवड ह्या दोन घटना
भाताच्या इतिहासात प्रामुख्याने भर घालतात. चिखल व रोवणी हे तंत्र विकसीत
झाल्यानंतर भातपीकाची लागवड झाली असावी. भातपीक कधी व कसा लोकांशी निगडीत झाला व
त्याची लागवड करण्यात आली याबद्दल विशिष्ट पुरावे उपलब्ध नाहित. चीन या देशात ११०००
वर्षापूर्वी यांगस्से नदीकाठीं भातशेती व्हायची असे पुरावे पुरातत्व विभागाच्या
नविनतम संशोधनानंतर समोर आले आहे. भातपीकाची पाणथळ लागवड करण्याची पद्धत चीन या
देशात सर्वप्रथम उपयोगात आली. ह्या पद्धतीचा प्रचार व प्रसार लवकरच लगतच्या
प्रदेशामध्ये झाला.
दक्षिणपूर्व आशिया :- ई.पू. २०००
इडोनेशिया :- ई. पू. १५००
इडोनेशिया :- ई. पू. १५००
जापान :- ई पू १००
युरोप :- ७०० AD
भारत :- ई. पू २००० – १५००
सध्या अस्तिवात असलेली पद्धत ४०० ते ५०० वर्षे जुनी आहे.
भारतात भातपीकाची लागवड गंगा नदीच्या लगतच्या प्रदेशात झाली याचे पुरावे आढळले
आहेत.
भातशेती, गोंदिया नजीक
सिंचन:- गोंदिया जिल्हयातील शेती ही पूर्णपणे पाऊसावर अवलंबुन असून काही क्षेत्रात पावसा अभावी सिंचनाची आवश्यकता भासते. ह्या क्षेत्रात पाऊस व सिंचना अभावी भातशेती करणे शक्य नाही. पावसा अभावी सिंचन हे विहीर, कालवा, जलयुक्त शिवार व जलाशय यांच्या माध्यमाने करण्यात येते.
गोंदिया जिल्हयात प्रामुख्याने २ मोठे सिंचन प्रकल्प, १० मध्यम व १९ लघु सिंचन प्रकल्प आहेत. गोंदीया जिल्यात जवळपास १४०० लघु व मध्यम तलाव आहेत. गोंदिया जिल्हा "तलावांचा जिल्हा" म्हणून प्रसिद्ध आहे.
वैनगंगा नदी, डांगुरली
वैनगंगा नदी ही गोंदिया जिल्हयातून वाहणारी प्रमुख आणि सर्वात लांब नदी आहे. बाघ, बावनथडी, गाढ़वी, चुलबंद ह्या वैनगंगेच्या उपनदया आहेत.
उन्हाळयात पाण्याची पातळी वैनगंगा नदी, डांगुरली
गोंदिया :- पेयजल पाणीपुरवठा व व्यवस्थापन :-

डांगुरली इथून वाहणारी वैनगंगा नदी, व खैरबंदा तलाव हे गोंदिया शहरा लगत असलेले पाण्याचे मुख्य स्त्रोत आहेत. हे प्रामुख्याने गोंदिया शहराची, उधोगधंदे, लगतचे खेडे यांची पाण्याची गरज भागवतात. हे दोन्हीं स्त्रोत गोंदिया शहरापासून ३०-४० किलोमिटर च्या अंतरावर आहेत.
गोंदिया शहरासाठी 12 MLD क्षमतेचा नविन जलप्रकिया व शुद्धीकरण केन्द्र शाशनाने स्थापण केलेला आहे. ह्या केन्द्राचे व्यवस्थापण महाराष्ट्र जीवन प्राधीकरण, महाराष्ट्र शाशन यांचेकडे आहे. वैनगंगा नदी, डागुरंली इथून गोंदिया शहराला पाणीपुरवठा केला जातो. शहराला पाणीपुरवठा करण्यापूर्वी या संयत्रात जलशुद्धीकरण केले जाते.
जलप्रकिया:-
गोंदिया येथिल जलशुद्धीकरन केन्द्रात प्रामुख्याने फेरीक अॅलम (तुरटी) जलप्रकियेसाठी उपयोगात आणली जाते.
नविन तंत्रज्ञान व संशोधना नंतर तयार करण्यात आलेले नॉनफेरीक अॅलम व पिएसी सुद्धा पाणी गोठण्यासाठी व शुद्धीकरण्यासाठी वापरता येते.

No comments:
Post a Comment